अखेर प्रतीक्षा संपली! बोर्डाने बारावीच्या निकालाची तारीख केली जाहीर
1 min read
पुणे दि.२०:- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख बोर्डाने जाहीर केली आहे. उद्या मंगळवारी २१ मे रोजी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती.
या साईट वर पाहा निकाल 1. mahresult.nic.in
2.http://www.mahahsscboard.in
3.https://results.digilocker.gov.in
4.https://results.digilocker.gov.in