समर्थ गुरुकुल दहावी सीबीएसईचा १०० टक्के निकाल
1 min read
बेल्हे दि.१६:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल,बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा नुकताच सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ नवी दिल्ली (सीबीएसई) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
शालेय जीवनामध्ये शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे,अंगभूत कला कौशल्यांना चालना मिळावी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी समर्थ गुरुकुल सातत्यपूर्ण प्रयत्नशील असते.
यावर्षी विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धा, रंगोत्सव स्पर्धा,सायन्स ऑलिंपियाड स्पर्धा,गायन स्पर्धा,कराटे स्पर्धा,विज्ञान प्रदर्शन आदींमध्ये सहभाग घेऊन यशस्वी झालेले आहेत.
रेहान पटेल या विद्यार्थ्याने ८४ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला.श्वेता मटाले ८३.२० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला.श्वेता बांगर हिने ७८.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला.तसेच तन्मय गलांडे ७७.४० टक्के तर समर्थ शेळके ७६.६० टक्के गुण मिळवत विशेष प्राविण्य संपादन केले.
या परीक्षेमध्ये ९ विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाल्याची माहिती क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी दिली.सदर विद्यार्थ्यांना शितल पाडेकर,प्रतीक्षा पटाडे,प्रिया कडूसकर,विशाखा शिंदे,कविता ठुबे,रामचंद्र मते,दिपाली नवले,पल्लवी शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
दहावीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,सारिका शेळके, ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य वैशाली आहेर,कॅम्पस
डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच सर्व विभागातील प्राचार्य,विभागप्रमुख यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.