विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी बोटा दहावी चा १०० टक्के निकाल
1 min read
बोटा दि.१६:- विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी बोटा (ता. संगमनेर) या शाळेचा सन 2023-24 या वर्षाचा इयत्ता दहावी सीबीएसई चा निकाल शंभर टक्के लागला असून ईश्वरी उत्तम कुरकुटे हिने प्रथम क्रमांक मिळवत 88.4 % मार्क मिळविले आहेत.
त्याबद्दल ईश्वरीचे सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर हर्षल किशोरी मुसळे याने द्वितीय क्रमांक मिळवत 75.4% व नउशिन इंतेहाज शेख हिने 74.2% मार्क मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे. तरी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्या सुनिता कडप्पा व विद्यानिकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूट सर्व मॅनेजमेंट कमिटी यांनी अभिनंदन केले आहे.
विद्यानिकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूट बोटा ही संस्था सन 2012 यावर्षी सुरू झाली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण अगदी सोप्या भाषेमध्ये देण्याचे कार्य करीत आहे. कमी फी मध्ये उत्कृष्ट दर्जाचे सीबीएसई बोर्डाचे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत आहे.