सीबीएसई बोर्ड परीक्षेत मॉडर्नच्या विद्यार्थांचे घवघवीत यश 

1 min read

बेल्हे दि.१५:- मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे (ता.जुन्नर) च्या इयत्ता १० वी व १२ वी सीबीएसई बोर्ड चा शैक्षणीक वर्ष २०२३-२४ चा निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याची माहिती प्राचार्या विद्या गाडगे यांनी दिली.

दहावीच्या वर्गातून प्रथम क्रमांक पार्थ विजयकुमार शर्मा ८५.२ टक्के, द्वितीय क्रमांक खराडे आदित्य वसंत ८४ टक्के तर तीकोने मंदार संजय ७९ टक्के मिळून तृतीय आला. तसेच बारावीच्या वर्गातून प्रथम क्रमांक तिकोन यश (८३.८ टक्के), द्वितीय क्रमांक डुकरे विघ्नेश (७९.६ टक्के) तर तृतीय क्रमांक दयान अत्तार (७७.८ टक्के) याने पटकवला.

उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे,सर्व संचालक मंडळ, प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के. पी.सिंग, शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे