जुन्नर विधानसभा मतदारसंघात १ लाख ८१ हजार मतदारांनी बजावला हक्क

1 min read

जुन्नर दि.१४:- शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि.१३) पार पडले. यात जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ५८.१५ टक्के इतके मतदान झाले होते. त्यामध्ये १ लाख ८१ हजार ५३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

जुन्नर विधानसभा मतदार संघात ३ लाख १२ हजार २०५ असे एकूण मतदार असून त्यापैकी १ लाख ५२ हजार ३७१ महिला तर १ लाख ५९ हजार ८३० पुरुष मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ८१ हजार ५१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

जुन्नर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात ३५६ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आलेली होती. मतदान झाल्यानंतर प्रक्रिया सुरुवातीला संथ गतीने मतदान सुरू होते. दुपारनंतर मतदान केंद्रांवर गर्दी होण्यास सुरुवात झाली होती.

मतदान करताना वयोवृद्ध, अपंग व्यक्ती यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला तर गावात राहणारे मतदारही स्वतःच्या गावातून मतदान करताना दिसत होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे