मोदींकडे स्वतःचे घर आणि गाडीही नाही; संपत्तीचा तपशील उघड
1 min read
वाराणसी, दि.१५:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदार संघातून उमेदवारी दाखल केल्यानंतर अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा तपशील उघड झाला आहे.
त्यानुसार ते ३ कोटींचे मालक असल्याचे दिसते आहे. पंतप्रधानांचे स्वतःचे घर नाही आणि त्यांच्याकडे कोणतेही वाहनही नाही. त्यांच्याकडे ५२,९२० रुपये रोख रक्कम आहे.
तसेच स्टेट बँकेच्या गांधी नगर शाखेत ७३,३०४ रुपये तर वाराणसी शाखेत ७ हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा आहेत. स्टेट बँकेतच त्यांची २ कोटी ८५ लाख ६०,३३८ ची एफडी आहे.