दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन
1 min read
निमगाव सावा दि.३१:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी संस्थेचे संस्थापक व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार तसेच बाळासाहेब गाडगे यांच्या शुभहस्ते धर्म रक्षक, राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक पांडुरंग पवार, सचिव परेश घोडे, बाळासाहेब गाडगे, कला शाखा समन्वयक प्रा. सुभाष घोडे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अनिल पडवळ, इतिहास विभाग प्रमुख प्रा. निलम गायकवाड, ग्रंथपाल प्रा.मंगल उनवणे, प्रा. शिवाजी साळवे, शांताराम गाडगे, अनिकेत वायकर, पूजा थिगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.