डॉ.अमोल कोल्हे यांचा शिवसेना महिला आघाडीकडुन झंझावाती प्रचार
1 min read
जांभोरी दि.७:- आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या तुतारी हे चिन्ह व कामाचा अहवाल घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख कलावती पोटकूले आणि तालुकाप्रमुख सुरेखा निघोट, उपतालुका प्रमुख निलम कारले यांनी केलेल्या प्रचार दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला.शिनोली, डिंभे बुद्रुक, खुर्द गोहे बुद्रुक, खुर्द,मापोली, चिखली, पोखरी, जांभोरी या गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर पाऊणशे वर्षांनीही पाणी, आरोग्य, रस्ते, वीज, शासकीय अनास्था अशा पायाभूत सुविधांची अपुरी सोयीने आदिवासी बांधव भगिनी त्रस्त आहेत, त्यामुळे शेकडो कोटींचा नीधी गेला कुठे असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे.
त्यामुळे प्रचारात आजवर राजकारणींनी भुलथापा देऊन फसवल्याची व केवळ निवडक लाभार्थ्यांनाच सर्व लाभ मिळत असल्याची व गरजुंना डावलले जाते ही भावना व्यक्त करत सत्ताधारींऐवजी तुतारीलाच मतदान करणार असल्याचे आदिवासी समाजबंधु भगीनींनी आवर्जून सांगितले.
त्यांच्या व्यथा, वेदना समजून घेऊन येत्या काळात महिलांमधुन चांगले नेतृत्व उभे करून प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर राहु अशी ग्वाही दिली. खासदार डॉ अमोल कोल्हे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन कलावती पोटकूले, प्रा.सुरेखा निघोट,निलम कारले यांनी केले.