लोकसभेच्या मतदानावर १० हजार मतदारांचा बहिष्कार

1 min read

आणे दि.४:- आणे पठारावरील पाणी समितीने आणे, पेमदरा, शिंदेवाडी, नवलेवाडी, भोसलेवाडी, व्हरुंडी व पठारावरील सर्व वाड्यांच्या साठी उपसा सिंचन योजना राबवण्यासाठी फेर जल नियोजनामध्ये समावेश होत नाही तो पर्यंत वरील गावांनी व आणे पठार पाणी संघर्ष समितीचे निर्णय घेतला असून.

त्यासाठी जोपर्यंत सकारात्मक निर्णय शासन घेत नाही व आणे पठार भागाचा जो पर्यंत कुकडी प्रकल्पच्या चौथ्या सुप्रीमात समावेश होत नाही तोपर्यंत लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एकमताने घेतला आहे. यावर गावोगावी २ ते ३ गावबैठका झाल्या आहेत. या सर्व गावांमधील एकूण ८ हजार मतदार व या गावातील बाहेर गावात असणारे सुमारे २ हजार मतदार लोकसभा निवडणुकीचे मध्ये मतदान करणार नाहीत.

आणे गावात शुक्रवार दि.३ रोजी आणे गावातील श्री रंगदास स्वामी महाराज मंदिरात पुन्हा सभा झाली तर सर्वांमध्ये मतदानावरती बहिष्कार घालण्याचा निर्णय झाला.

या गावसभेमध्ये सरपंच प्रियांका दाते, उपसरपंच सुहास आहेर, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब दाते, प्रदिप आहेर, डॉ.दिपक आहेर, प्रकाश दाते, विनायक आहेर, किरण आहेर, मधुकर दाते यांनी आपली बहिष्कारा बाबतची मते मांडली.

मतदानावरील बहिष्कार कायम ठेवण्याच्या मधुकर दाते यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत उपस्थितांनी हात उंचावत संमती दर्शवली. सुत्रसंचालन बाबाजी आहेर यांनी केले तर आभार भास्कर डोंगरे यांनी मानले.


आणे पठारावरील पाणी संघर्ष समितीने जो मतदानावर बहिष्कारचा ठराव केला आहे. त्यावर ग्रामपंचायत, सदस्य व आणे ग्रामस्थ ठाम असून कोणीही लोकसभेला मतदान करणार नाही.’

प्रियांका दाते, सरपंच आणे

वरिष्ठ पातळीवरून शब्द मिळाल्यास बहिष्कार मागे घेण्याची भूमिका मांडून कोणीही दखल न घेतल्यास आंदोलन अधिकाधिक तीव्र केले जाईल.’

जयराम दाते, ग्रामस्थ

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे