विद्यानिकेतनच्या स्नेहसंमेलनात विठू माऊलीचा गजर तर प्रभू श्री रामाचा जयघोष
1 min read
साकोरी दि.६:- विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध प्रकारचे नृत्य प्रकार विद्यानिकेतन फेस्टिव्हल मध्ये सादर करण्यात आले. संत गोरा कुंभार यांचा जीवनपट उलगडून दाखवून नाटिका सादर करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग साळवे यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण प्राप्त व्हावे.
या हेतूने साकोरी (ता.जुन्नर) येथे सुरू केलेली शेतकऱ्यांच्या मुलांची एकमेव संस्था आहे.या कार्यक्रमात मोबाइल सोशियल मीडियामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी माहिती दिली गेली.ओलंपियाड, स्कॉलरशिप, रंगोत्सव, इलेमेंटरी, तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा यामध्ये नैपुण्य प्राप्त करणाऱ्या ४00 हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ मध्ये मेडल.
प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह देऊन विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी च्या प्राचार्या रुपाली पवार- भालेराव, पी एम हायस्कुल आणि ज्युनियर कॉलेज च्या प्राचार्या सुनीता शेगर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
शाळेची माजी विद्यार्थिनी सायली गाडगे हिने उत्तुंग भरारी घेत एमबीबीएस परीक्षेत यश संपादित केले. याबद्दल तिचेही कौतुक करण्यात आले.
सलग २ दिवस चाललेल्या विद्यानिकेतन फेस्टिव्हल साठी मोठ्या संख्येने जनसमुदाय, पालकवर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता औटी तसेच लीनता दुपारे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे संस्थापक पी एम साळवे यांनी केले.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांची शाळा म्हणजेच विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी.पी एम हायस्कुल आणि ज्युनियर कॉलेज सतत नऊ वर्ष तालुकास्तरीय गुणवंत शाळा पुरस्कार प्राप्त करणारी जुन्नरच्या पूर्व भागातील एकमेव शिक्षणसंस्था आहे.
सलग दहा वर्ष दहावीच्या विद्यार्थ्यांचा शंभर टक्के निकाल देणारी शिक्षण संस्था आपल्या कौशल्याने दरवर्षी उत्कृष्ट निकाल लागला जातो.
ओलंपियाड, स्कॉलरशिप यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी पहावयास मिळते.शाळेत साजऱ्या होणाऱ्या विविध शालेय उपक्रमातून (सण ,उत्सव, महापुरुषांच्या जयंती,आषाढी एकादशी दिंडी, वृक्षदिंडी, महिला पालकांसाठी मंगळागौर स्पर्धा) विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालून त्यांना सुसंस्कारित केले जाते.