गुळुंचवाडी शाळेत ‘पाखरांची शाळा’ उन्हाळी शिबीर उत्साहात संपन्न

1 min read

गुळुंचवाडी दि.३:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळुंचवाडी येथे द हंस फाऊंडेशन, शिक्षणा फाऊंडेशन व पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने दहा दिवसांच्या ‘पाखरांची शाळा’ या उन्हाळी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांमधील उपजत, सुप्त क्षमतांच्या विकासाला चालना मिळावी,विविध कौशल्यांचा विकास व्हावा, मनोरंजनातून आनंद मिळावा या उद्देशाने या बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिरादरम्यान सकाळी 8 ते 10 या वेळेत अनेक मनोरंजक खेळ, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे,चित्रकला, क्राफ्ट,कागदकाम, भौमितिक आकार, पुठ्ठ्यापासून घड्याळ,विविध प्रकारची गाणी व गोष्टी असे अनेक आनंददायी उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात आले.या शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थांमधून उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून अन्वी शांतीलाल गिरी, कृष्णा संतोष गुंजाळ, सार्थकी शिंदे यांची निवड करून त्यांना संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले.तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.शिबीराच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगनाथ भांबेरे, उपाध्यक्ष चंचल गुंजाळ, सुषमा भांबेरे, जिजाभाऊ काळे, विठ्ठल खिलारी, रामचंद्र जाधव, संतोष गुंजाळ,नरेश भांबेरे, रोहन घोडके, तनुजा गुंजाळ व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.शिक्षणा फॉउंडेशन चे प्रतिनिधी रामदास दाभाडे, सौरभ दिघे, कृष्णा दूधवडे, विशाल हगवणे यांचा या उन्हाळी शिबिराच्या आयोजाबद्दल शाळा व व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. गेल्या सहा महिन्यांपासून शाळेत संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुऱ्हाडे यांनी संस्थेचे आभार मानले.पंचायत समिती जुन्नरच्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे, केंद्रप्रमुख शोभा वाकचौरे, सविता कुऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत असल्याबद्दल शिक्षणा फॉउंडेशनचे विशेष आभार मानले. या शिबिरासाठी शाळेतील सरिता मटाले, ज्योती फापाळे, नरजहाँ पटेल, अशोक बांगर, ज्ञानेश्वर जाधव या सर्वांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे