खोडद ग्रामीण विज्ञान केंद्राचा विद्यार्थ्यांसाठी वाचन संस्कृती निर्माण करणारा उपक्रम
1 min read
खोडद दि.२:- खोडद (ता.जुन्नर) ग्रामीण विज्ञान केंद्राचा वाचन संस्कृती निर्माण करणारा उपक्रम आजकाल विद्यार्थी वर्ग वाचनापासून दूर होत चालल्याचे दिसत आहे.टीव्ही. , मोबाईलचा वाढता प्रसार आणि केवळ गुण मिळवण्यासाठी केला जाणारा अभ्यास ही वाचन संस्कृती लोप पावण्यासाठी करणे ठरत आहेत.विद्यार्थ्यांना पुन्हा वाचनाकडे वळवण्यासाठी खोडद ग्रामीण विज्ञान केंद्राने उन्हाळी सुट्टीत एक खास उपक्रम आखला आहे.विद्यार्थ्यांनी सुट्टीत वैज्ञानिक विषयाशी संबंधित कुठलेही एखादे पुस्तक वाचून त्यावर किमान दहा ओळीत अभिप्राय किंवा त्या पुस्तकाचे समीक्षण लिहायचे आहे.
विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिप्राय किंवा समीक्षण दि. ३१ मे पर्यंत ९५११६९९६०१ या व्हाट्सअप फोनवर पीडीएफ स्वरूपात पटवायचे आहे.उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्रे तर उत्कृष्ट अभिप्राय किंवा समीक्षणाला पुस्तक स्वरूपात बक्षिसे दिली जातील. विद्यार्थी वर्गाला वाचनाकडे वळवत त्यावर विचार करायला आणि लेखनाला प्रेरणा देणारा हा उपक्रम आहे.
विद्यार्थी पातळीवर नक्कीच वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मोलाची मदत होणारा हा उपक्रम असून, विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यासाठी शिक्षक, वाचक तसेच संबंधित संस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.