आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ

1 min read

पुणे, दि.१:- आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागावरील प्रवेशासाठी पालकांना आपल्या बालकांचे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरीता १० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित. शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता १६ एप्रिल पासून सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यात आता आणखी मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे. आरटीई प्रवेशासाठी राज्यातील ७६ हजार ५३ शाळांची नोंदणी झाली असून ८ लाख ८६ हजार ४११ प्रवेशाच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे