बेल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत उन्हाळी शिबिराचे आयोजन
1 min read
बेल्हे दि.१:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं-१ (ता.जुन्नर) शाळेत पाखरांची शाळा या उन्हाळी शिबिराचे आयोजन द हंस फाउंडेशन, शिक्षणा फाउंडेशन व पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या शिबिरादरम्यान दहा दिवसांमध्ये सकाळी 8 ते 11 या वेळेत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अनेक आनंददायी ऍक्टिव्हिटी घेऊन मुलांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करण्यात आला.या शिबिरामध्ये पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्यासाठी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, घड्याळ तयार करणे, भौमितिक आकार तयार करणे ,नकाशा काढणे तसेच अनेक मनोरंजक खेळांचा समावेश करण्यात आला. सहभागी विद्यार्थांमधून सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून आयुष कोकणे, कृष्णा पानसरे ,सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी परसिस जैसवार यांची निवड करून त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.उन्हाळी शिबिराच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सुप्रिया बांगर ,सदस्य दादाभाऊ मुलमुले व संतोष पाबळे, मनिषा बांगर ,वैशाली मटाले व अनेक पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
संस्थेचे प्रतिनिधी स्वाती शेलार व आदेश जगताप यांनी हे उन्हाळी शिबिर घेतल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका मिरा बेलकर यांनी संस्थेचे आभार मानले. पंचायत समिती जुन्नर गट शिक्षणाधिकारी अनिता शिंदे विस्ताराधिकारी, विष्णू धोंडगे.
केंद्रप्रमुख सोपान बेलकर यांनी शिक्षणा फाउंडेशनचे विशेष आभार मानले. या शिबिरासाठी शाळेतील उपशिक्षक हरिदास घोडे, संतोष डुकरे, कविता सहाणे सुवर्णा गाढवे, प्रवीणा नाईकवाडी, योगिता जाधव, सुषमा गाडेकर अंजना चौरे या सर्वांचे सहकार्य लाभले.