लोकसभा निवडणूक भरारी पथकाकडून एक कोटीची रोकड जप्त

बीड दि.६: – देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी निवडणूक भरारी पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. अशातच आता बीडमध्ये देखील कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

गेवराई तालुक्यातील खामगावमध्ये असलेल्या जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेकपोस्टवर एका इनोव्हा वाहनातून एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चेकपोस्टवर इनोव्हामध्ये तब्बल एक कोटी कॅश पोलिसांना सापडली. पण ही कोट्यवधींची रक्कम छत्रपती संभाजीनगर येथील बँकेच्या शाखेतून काढली असल्याचे सांगण्यात आले आहे.

परंतु, ही रक्कम खरंच छत्रपती संभाजीनगरमधल्या शाखेतून काढली गेली की नाही, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येणार आहे. पण ही रक्कम बीड येथील द्वारकादास मंत्री बँकेच्या मुख्य शाखेत आणली जात होती, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे