विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! २७ मे ला दहावीचा निकाल लागणार 

1 min read

पुणे दि.२५:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी- मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंडळाने बारावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर केल्यानंतर आता दहावीचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांसह पालकांना होती.

आता अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल २७ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.

राज्यात दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ या दरम्यान पार पडली होती. यंदा १६ लाख ९ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या वेबसाईटवर विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकणार आहेत.

अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे