वाढदिवसाचा खर्च टाळून दुष्काळी गावासाठी २५ हजार लिटर पाणी
1 min read
आणे दि.४:- आणे (ता. जुन्नर) सध्या तीव्र उन्हाळा आणि भीषण दुष्काळामुळे आणे पठार भाग हवालदिल झाला आहे. जनावरांच्या चारा पाण्याबरोबर ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याप्रसंगी पाण्यासाठी काही दानशूर व्यक्तींनी आणे परिसरात टँकर उपलब्ध करून दिले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते व जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ऍड.संतोष आहेर यांनी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन आपल्या मुलाच्या वाढदिवसावर अनाठायी खर्च करण्याऐवजी आणे ग्रामस्थांसाठी पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला आहे.
आणे येथील सामाजिक कार्यकर्ते ऍड.संतोष आहेर यांच्या मुलाचा अकरावा वाढदिवसाच्या निमित्ताने श्री क्षेत्र आणे गावात पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन मुलगा आराध्यच्या
वाढदिवसासाठी करण्यात येणारा अनाठायी खर्च टाळून त्याऐवजी २५ हजार लिटरच्या टँकरच्या माध्यमातून आणे ग्रामस्थांना सर्व मित्र परिवाराच्या तसेच उद्योजक शंकर चिकणे.
युवा नेते प्रशांत दाते, अमित आहेर, अशोक देशमुख, ज्ञानेश देशमुख आदी उपस्थितीत पाणी उपलब्ध करून दिले.
“गावात रोज कुणाचा ना कुणाचा तरी वाढदिवस असतो त्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात विनाकारण खर्च करत असतात त्याऐवजी लोकांनी अशा प्रकारे मदत करून वाढदिवस साजरा केल्यास जनतेची दुष्काळात मोठी मदत पण होईल आणि लोकांचे आशीर्वाद मिळतील.
प्रियांका दाते, सरपंच आणे