महाराष्ट्र दिनी आळे येथे शाळेच्या शिपायाला मिळाला ध्वजवंदनाचा मान
1 min read
आळे दि.२:- ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे संतवाडी- कोळवाडी ही जुन्नर तालुक्यातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेने गुणवत्ता पूर्ण शिक्षणाच्या जोरावर संस्कारसंपन्न आणि कर्तबगार विद्यार्थी घडविणारी शैक्षणिक संस्था म्हणून पुणे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही स्वतःचा लौकिक निर्माण केला आहे.
या संस्थेने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दैदीप्यमान कामगिरी करणारे अनेक विद्यार्थी घडवले आहेत. हे सर्व विद्यार्थी ज्यांच्याद्वारे घडतात अशा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा यथायोग्य सन्मान करण्याची परंपरा ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाने फार पूर्वीपासून जोपासली आहे.
१ मे हा दिवस आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन म्हणून अत्यंत उत्साहाने साजरा करतो. जागतिक कामगार दिन देखील साजरा केला जातो. ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये महाराष्ट्र दिन साजरा करत असताना. ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुलवळे व सर्व संचालक मंडळ यांनी संस्थेचे नाईक – शिपाई काशिनाथ ठोंगिरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला.