नीलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल
1 min read
अहिल्यानगर दि.२३:- नीलेश लंके यांनी मंगळवार दि.२३ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीतर्फे हनुमान जयंतीचा मुहर्त साधत त्यांना गदा भेट देण्यात आली.
लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांना उमेदवार आहेत.नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
नीलेश लंके हे पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना नीलेश लंके टक्कर देणार आहेत. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी हाेणार असून यात आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास नीलेश लंके यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे नेते जयंत वाघ, शिवसेना नेते शशिकांत गाडे आदी उपस्थित हाेते.