नीलेश लंके आज साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल करणार
1 min read
नगर दि.२३:- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके मंगळवारी (दि.२३) सकाळी १० ते ११ वाजता साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
यावेळी मतदारसंघातील आजी-माजी आमदार, महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती लंके यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली.
सन २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही लंके यांनी शक्तिप्रदर्शन न करता अंध, अपंग, विधवा, परित्यक्त्यांच्या हस्ते आपला अर्ज दाखल केला होता. तशाच पद्धतीने आता लोकसभा निवडणुकीतही अर्ज दाखल करताना लंके कोणतेही शक्तिप्रदर्शन करणार नाहीत.
लोकसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या आमदार नीलेश लंके यांनी निवडणूक दृष्टिपथात आल्यानंतर शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राणी लंके यांनी मतदारसंघातील गावागावांमध्ये जात शिवविचार पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्या निमित्ताने लंके हे घरोघर पोहोचले आहेत.