प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकांचे नाव छापणे बंधनकारक

1 min read

पुणे दि.२५:- देशात लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात संबंधित मुद्रक प्रिंटर्सनी प्रचार साहित्य तसेच इतर छपाई बाबत विशेष काळजी घेऊन आचारसंहितेचे पालन करावे. प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकांचे नाव छापणे बंधनकारक आहे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी करत आहेत.कोणत्याही व्यक्तीला निवडणूक पत्रिका, भित्तीपत्रके, होल्डिंग्स, फ्लेक्स बोर्ड तो स्वतःच त्याचा प्रकाशक आहे. याबद्दल स्वतः स्वाक्षरित केलेले आणि ज्या व्यक्ती तिला व्यक्तिशः ओळखतात अशा दोन व्यक्तीनी साक्षांकित केलेले अधिकथन त्याने मुद्रकाला दोन प्रतीमध्ये द्यावेत. लोकप्रतिनिधीत्व अधिनियमानुसार तरतुदींचा भंग केल्यास मुद्रक किंवा प्रकाशकास सहा महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा किंवा दाेन हजार रुपये दंड किंवा दाेन्ही शिक्षा हाेऊ शकते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे