एल अँड टी कंपनीत ‘समर्थ पॉलिटेक्निक’ च्या विद्यार्थ्यांची निवड
1 min read
बेल्हे दि.२१:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित,समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे (ता.जुन्नर) येथील ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या “पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह २०२४” अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील विद्यार्थ्यांची एल अँड टी,चाकण (पुणे) या नामांकित कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.समर्थ पॉलिटेक्निक च्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागांतर्गत पूल कॅम्पस २०२४ द्वारे विविध महाविद्यालयातील १५० विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या.या पूल कॅम्पस ड्राइव्ह मध्ये जुन्नर,आंबेगाव,अकोले व संगमनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.
एल अँड टी कंपनीच्या वतीने मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया गोरक्षनाथ औटी,एच आर मॅनेजर विलास पवार,निखिल महाजन,संदीप अलुरे व अक्षय बेल्हेकर यांनी पूर्ण केली.समर्थ संकुलातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे :
*इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग*प्रतीक भोर,सुमित गाडेकर,साक्षी ठुबे. *मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग* आर्यन वाफारे, ओमकार आवारी,अनिकेत दिघे,प्रतीक लाळगे,अनुष्का परदेशी,प्रमोद गुंजाळ. सदर प्लेसमेंट साठी ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.संकेत विघे,शैक्षणिक समन्वयक प्रा.संजय कंधारे.
मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा.महेंद्र खटाटे,इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.आशिष झाडोकर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा.आदिनाथ सातपुते,प्रा.हुसेन मोमीन,प्रा.माधवी भोर आदींनी परिश्रम घेतले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा राजीव सावंत,टेक्निकल डायरेक्टर चंद्रशेखर घुले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी अभिनंदन केले.