बेल्ह्यातील साईसंस्कार क्लासेस येथे इयत्ता दहावी- बारावीच्या बॅचेस सुरू

1 min read

बेल्हे दि.२२:- ग्रामीण भागामध्ये सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा आणि गेली 11 वर्षे सर्वोत्कृष्ट निकाल देणारा एकमेव क्लास म्हणून नावारूपास आलेला ‘साईसंस्कार क्लासेस’ या ठिकाणी इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या 2024 – 25 या शैक्षणिक वर्षासाठी नवीन बॅचेस सुरू झालेल्या आहेत.

क्लासची वैशिष्ट्ये:- प्रत्येक विषयासाठी वेगळे उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक, विद्यार्थ्यांना मोफत नोट्स, प्रत्येक आठवड्याला सराव परीक्षा, सीसीटीव्ही नियंत्रित क्लासरूम, हसत खेळत शिक्षण, मोफत लायब्ररीची सुविधा, 86 इंची स्मार्टबोर्ड वर शिक्षण देणारा ग्रामीण भागातील एकमेव क्लास, ग्रामीण भागातील पालकांचा विचार करून असलेली माफक फी आहे.

इयत्ता 10 वी आणि 12 वीचे सर्व विषयांचे क्लास या ठिकाणी घेतले जातात तरी 10 वी आणि 12 वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी 30 एप्रिल 2024 पूर्वी आपला प्रवेश निश्चित करून आपला शैक्षणिक स्तर उंचवावा असे आवाहन क्लासचे संचालक अमर डुकरे यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे