गुळूंचवाडी प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व स्वागत : शाळा पूर्व तयारी अभियान मेळाव्याचे उत्साहात आयोजन

1 min read

गुळूंचवाडी दि.२३:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळूंचवाडी (ता.जुन्नर) येथे शाळापूर्व तयारी मेळावा अभियानांतर्गत ‘पहिले पाऊल’ अर्थात ‘प्रवेशोत्सव’ उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडला. सहा वर्ष पूर्ण झालेल्या चिमुरड्यांनी शाळेत पहिले पाऊल टाकले. त्यासाठी शाळा पूर्वतयारी मेळावा आयोजित करून या भावी विद्यार्थ्यांना औक्षण करत वर्गात प्रवेश देण्यात आला. ढोल लेझीम व ताशांच्या गजरात या चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने शाळेचा परिसर या चिमुकल्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी भरला होता. शाळेत येताना शाळेविषयी असलेली मनातील भीती कमी व्हावी. आणि त्यांचे शैक्षणिक भविष्य सुखकर तसेच आनंददायी होण्यासाठी येथील शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीने प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रंगनाथ भांबेरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.या मेळाव्याच्या आयोजनाचा उद्देश प्रस्ताविकेतून शाळेतील शिक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी सांगितला. शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुऱ्हाडे यांनी मेळाव्याचे महत्व सांगून दाखल पात्र विद्यार्थ्यांचे व उपस्थित सर्व पालकांचे स्वागत केले. सर्व दाखलपात्र विद्यार्थ्यांना आकर्षक कागदी टोपी घालून तसेच हातात रंगीबेरंगी फुगे व गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.या शाळा पूर्व मेळाव्यात एकूण सात प्रकारचे स्टॉल लावण्यात आले. यामध्ये नोंदणी विभाग, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषा विकास,गणन पूर्वतयारी, समुपदेशन यासारखे स्टॉल लावण्यात आले होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांची शाळा पूर्वतयारी कशी आहे हे या पहिल्या मेळाव्यातून समजून आले. याप्रसंगी दाखल पात्र विद्यार्थ्यांना कृतिपुस्तकेचे वितरण करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला. या चिमुरड्यांच्या स्वागतासाठी शालेय व्हरांडा आकर्षक रांगोळी व फुलांनी सजवला होता तसेच विविध स्लोगन फलक मांडण्यात आले होते. विशेष म्हणजे सर्वांचा आनंद वाढवणारा सेल्फी पॉईंट मेळाव्याचे खास आकर्षण ठरला. यावेळी दाखल विद्यार्थ्यांना व पालकांना शाळेच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रंगनाथ भांबेरे, उपाध्यक्षा चंचल गुंजाळ, सदस्या सुषमा भांबेरे,गौरव करडीले, सुभाष शिरतर,दत्तात्रय गुंजाळ, शांताराम भांबेरे, दिलीप जाधव, बबन काळे, जिजाभाऊ जाधव,विठ्ठल जाधव, उल्हासा भांबेरे, सुप्रिया भारतीगोसावी,राजश्री गुंजाळ, सुमन औटी.लका गायखे, सोनाली करडीले,लिलाबाई पिंगट,शारदा जाधव, वनिता कोतवाल,कुसुम भांबेरे,विठ्ठलवाडी व गुळुंचवाडीतील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. मेळावा यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुऱ्हाडे, सरिता मटाले, ज्योती फापाळे, नरजहाँ पटेल, अशोक बांगर, ज्ञानेश्वर जाधव,महेश साबळे अंगणवाडी सेविका शोभा काळे,सखुबाई भांबेरे, लीडर माता, स्वयंसेवक यांनी सहकार्य केले व परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे