साईसंस्कार क्लासेसच्या MHT -CET च्या विद्यार्थ्यांना निरोप
1 min readबेल्हे दि.२०:- बेल्हे (ता.जुन्नर) येथील साईसंस्कार क्लासेस येथील एमएचटी-सीईटी या परीक्षेचा क्रॅश कोर्स बॅचचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला.
प्रथमता सर्व विद्यार्थ्यांकडून क्लासमधील सर्व शिक्षकांचे सत्कार करण्यात आले. यावेळी श्रुती काणे, ज्योती गुंजाळ, आकांक्षा दाभाडे, अनुजा उंडे, रीमशा चौगुले, संस्कृती औटी, अनिशा विश्वासराव, श्रुतिका डुकरे, ऋत्विक बोरचटे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना क्लासमध्ये
डिजिटल बोर्डवर शिकवल्यामुळे त्यांना कसा फायदा झाला, दररोज घेतल्या जाणाऱ्या टेस्ट व त्यामुळे होणारा अभ्यास, अभ्यासासोबतच क्लासमध्ये व्यक्तिमत्व विकासावर दिला जाणारा भर, क्लासमध्ये असलेली कडक शिस्त व
त्यासोबतच घेतले जाणारे वेगवेगळे मनोरंजनात्मक उपक्रम, हसत-खेळत दिले जाणारे शिक्षण याबद्दल आपले मत मांडून क्लासच्या सर्व शिक्षकांचे व संचालकांचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांना आवारी सर, सुपेकर सर, सहाणे सर, जोंधळे सर, डुकरे मॅडम यांनी परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन योग्य मार्गदर्शन केले.
क्लासचे संचालक अमर डुकरे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात देखील आपण कोणत्याही वेळी मदतीसाठी उपलब्ध असल्याचे सांगत शिकून खूप मोठे व्हा परंतु आपले पाय कायमचे जमिनीवर असू द्या असे सांगत शुभेच्छा दिल्या व आपले छोटे भाऊ-बहीण यांना पुढील शिक्षणासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्याबाबत सुचवले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्लासची विद्यार्थी तनिष्का गाडगे हिने केले. यानंतर अल्पोपहार व मनोरंजनात्मक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.