गुंजाळवाडीत शाळा पूर्वतयारी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

1 min read

गुंजाळवाडी दि.२०:- पुढील शैक्षणिक वर्षात ज्ञानमंदिरात प्रवेश घेणाऱ्या अन आपल्या शैक्षणिक विश्वाला आकार देण्यासाठी शिक्षणाचा श्रीगणेशा करणाऱ्या बालचमूंसाठी शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे यशस्वी आयोजन शनिवार दि.२० रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजाळवाडी (बेल्हे) शाळेत करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान विविध उपक्रमांतून जाणून घेऊन विविध क्षमता वृद्धी होण्यासाठी शाळेतील १ ले पाऊल पुस्तिका तुकाराम खोडदे यांनी सर्वांना समजावून देत या पुस्तिकांचे नवागतांना वाटप करून त्यातील घटकांचा पालकांनी सुट्टीत सराव घेण्याचे सर्वांना आवाहन करत विकास पत्रात अंगणवाडी शिक्षिका व पालकांनी नोंदी घेतल्या. या प्रसंगी शाळा समिती उपाध्यक्ष मारूती बोरचटे मेजर, ग्राम.पं.सदस्या दिपाली बोरचटे व अनन्या तपासे, प्रकाश काळे, रोहिणी बोरचटे, शालेय विद्यार्थी इ.उपस्थित होते. पालकवर्ग, माता भागिनींचा यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सरपंच नयना गुंजाळ यांनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या. व आपल्या शाळेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन डिजीटल शिक्षण पद्धतीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी ढोल ताशांच्या गजरातील मिरवणूक, औक्षण, सेल्फी पॉईंट, फलकलेखन, नेत्रदिपक रांगोळी, सजावट यामुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले. या मेळाव्यास केंद्रप्रमुख सोपान बेलकर, विष्णू धोंडगे (वि.अ.शिक्षण) यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे