समर्थ शैक्षणिक संकुलात बीबीए व बीसीए प्रवेशप्रक्रियेसाठी समुपदेशन

1 min read

बेल्हे दि.२०:- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता घेण्यात येणाऱ्या महा-बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२४ ही सामायिक प्रवेश परीक्षा प्रथमच महाराष्ट्र राज्यात घेणार आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करता ज्या उमेदवारांना बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावयाचे आहेत अशा उमेदवारांकरता महा-बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२४ सामायिक प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. त्यासाठी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे यासाठीचा कालावधी दिनांक २१ मार्च २०२४ ते ३० मार्च २०२४ पर्यंत देण्यात आलेला आहे. सदर सामायिक प्रवेश परीक्षा २७ ते २९ मे २०२४ या कालावधीत घेण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांमध्ये बीबीए व बीसीए या अभ्यासक्रमांकडे वाढता कल पाहता प्रवेश प्रक्रियेचे टप्पे त्याचबरोबर यावर्षीपासून प्रथमच महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेली सामायिक प्रवेश परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती मिळावी. म्हणून समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने प्रवेश प्रक्रिया व विविध अभ्यासक्रम याबाबतचे समुपदेशन केले जात आहे. या समुपदेशनाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स चे प्राचार्य डॉ उत्तम शेलार यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.विविध अभ्यासक्रम व प्रवेश प्रक्रियेचे टप्पे याबाबत अधिक माहितीसाठी www.mahacet.org या अधिकृत संकेत स्थळावर तसेच प्रा.गणेश बोरचटे-८६००७७६३०७, प्रा.प्रशांत काशीद-९८६०३३४५१९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे