जवाहर नवोदय परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आर्यन मालुंजकरचे यश
1 min read
आळे दि.४:- आळे (ता. जुन्नर) जवाहर नवोदय परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळेफाटा येथील पाचवीत शिकणारा आर्यन रमेश मालुंजकर या विद्यार्थ्याने दैदिप्यमान यश मिळवले. मार्गदर्शक शिक्षक, अधिकारी या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.
या वेळी आर्यन मालुंजकर या विद्यार्थ्याचा सत्कार कोळवाडी (आळे) च्या ग्रामपंचायत सदस्य ललिता प्रविण पारवे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी प्रा. रमेश मालुंजकर, मालुंजकर क्लासेस च्या प्रा. ज्योती मालुंजकर उपस्थित होते. या वेळी ग्रामस्थ व पालक वर्गातून आर्यन चे अभिनंदन करण्यात आले.