गुरुवर्य देव प्रशालेत ३३ वर्षांनी भरला इयत्ता दहावीच्या वर्ग

1 min read

बोरी खुर्द दि.४:- बोरी खुर्द (ता.जुन्नर) येथील गुरुवर्य ए गो.देव प्रशालेच्या सन १९९०-९१ व १९९१-९२ या दोन वर्षांच्या बॅचमधील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सुमारे ३३ वर्षांनी हे विद्यार्थी पुन्हा एकत्र आल्याने सर्वजण आनंदात दिसत होते.या स्नेहमेळाव्याची सुरुवात विद्यार्थी दशेप्रमानेच शालेय मैदानावर परिपाठाने झाली. उपस्थित शिक्षकांच्या हस्ते सरस्वती व गुरुवर्य देव सरांच्या प्रतिमेचे पूजन करून स्नेह मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रशालेचे नुकतेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी भूषविले. विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक संजय थिटे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक महेंद्र गणपुले, माजी शिक्षिका हिरा कोरडे, प्रशालेचे मुख्याध्यापक शमशुद्दिन पटेल, प्रशालेचे शिक्षक संजय धायबर, अमित शेटे,लेखनिक सुरेश शेळके, सेवक तानाजी शेटे व रवींद्र जाधव हे उपस्थित होते. या सर्व गुरुजनांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपण काम करत असलेल्या क्षेत्राचा परिचय दिला. गुरुजनांच्या हस्ते त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.माजी विद्यार्थ्यांच्या वतीने अनिल काळे,‍ सुनिल शिंदे , अशोक काळे, कृष्णराज बाबा शास्त्री, आशा काळे, सीमा चिंचवडे, योजना काळे, शैलजा शिंदे, विमल काळे. प्रेमल पटाडे , शिवराम बांगर यांनी शालेय जीवनातील आठवणी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या आणि वर्गात शिक्षकांचा खाललेला मार, मित्र- मैत्रिणीच्या काढलेल्या खोड्या, केलेली धमाल मजा, अभ्यास आणि खेळात घेतलेला आनंद मनोगतातून व्यक्त केला. शिक्षकांनी केलेल्या संस्करामुळेच आम्ही आज वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर काम करत आहोत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अशा भावना व्यक्त केल्या.शिक्षकांनी या विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील काही किस्से सांगून त्याकाळातील व आताचे शालेय जीवन व चढ-उतार यांची माहिती दिली. शालेय जीवनातील क्षण हे मोत्याप्रमाणे असतात त्यांना आयुष्यभर अलगदपणे जपून ठेवताना शाळेशी सातत्याने नाळ जोडून राहा, भेटा, बोला अशा भावना मांडल्या.ही शाळा सदैव तुमचीच आहे असे विद्यार्थ्यांप्रती जिव्हाळा प्रेम दर्शवणारे भाव व्यक्त केले. दिवसभरातील व्यस्त कार्यक्रमात गप्पा, गाणी, गोष्टी स्नेहभोजन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी जीवनातील ताणतणाव विसरून सर्वजण बालपणीच्या आठवणीत रममाण झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संपत बांगर सर,मुख्याध्यापक अंकुश काळे सर,शिवराम बांगर,सुभाष शिंदे,विलास बांगर,कैलास बांगर,विलास काळे,प्रसाद शिंदे ,गणपत शिंदे,अशोक काळे ,अनिल काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेस उपयुक्त भेटवस्तू प्रदान करण्यात आली.शाळा ही आपली आहे, शाळेसाठी जी मदत लागेल ती यापुढेही आम्ही करण्यास तयार आहोत असे अश्वस्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचा माजी विद्यार्थी अंकुश काळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रशालेचा माजी विद्यार्थी संपत बांगर यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रेमल पटाडे हिने केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे