आर्यन मालुंजकरला मंथन परीक्षेत २८४ गुण
1 min read
आळे दि.५:- आळे (दि.५) जुन्नर तालुक्यातील आळे येथील आर्यन मालुंजकर याची जवाहर नवोदय विद्यालय पिंपळे जगताप येथे पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळेफाटा येथे इ.५ वीच्या वर्गात आर्यन शिक्षण घेत आहे. या वर्षाच्या मंथन परीक्षेत सुद्धा २८४ गुण मिळवून त्याने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. आर्यनचे वडील श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल रानमळा (बेल्हे) येथे शिक्षक असून आई आळे या ठिकाणी मालुंजकर क्लासेस च्या संचालिका आहेत.आर्यनच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.