लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कुणीही माझा फोटो, नाव वापरू नये:- मनोज जरांगे पाटील
1 min read
जालना दि.२:- लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. त्यानुसार प्रत्येक पक्ष आपापल्या परीने जोरदार प्रचार करत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती आणि प्रचाराची तयारी सर्व पक्षांनी सुरु केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे भाजपने देखील ‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार..’ असा नारा दिला आहे. महाराष्ट्रात पहिल्या दोन टप्प्यात निवडणूक प्रचार जोरात सुरु झाला असून, नेते आणि कर्तायकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
अश्यातच आता, लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवार देणार नसल्याची घोषणा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आज आणखी एक मोठी घोषणा केली आहे. “लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कुणीही माझा फोटो, नाव वापरू नयेत” असे जरांगे म्हणाले आहेत. तसेच, असे कुणी केल्यास त्याला मराठा समाजाने मदत करू नयेत असे आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केले आहे.
यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “माझा कोणालाही पाठिंबा नाही, मराठा समाजाने राज्यात एकही उमेदवार दिला नाही. कोणीही माझा फोटोचा वापरू नका आणि नावही वापरू नका, तुम्ही एकाने वापरला तर बाकीचे पक्ष सुद्धा वापरतील.
तुमच्या स्वार्थासाठी, राजकीय फायद्यासाठी तुम्ही विनाकारण मराठा आंदोलनाचा आणि तुमच्या स्वार्थासाठी, राजकीय फायद्यासाठी तुम्ही विनाकारण मराठा आंदोलनाचा आणि आरक्षणाचा फायदा घेऊ नका. जो जाणून- बुजून नाव घेतो किंवा फोटो वापरतोय त्यांना मराठा समाजाने मदत करू नये, असे आवाहन जरांगे यांनी केले आहेत.
लोकसभा निवडणुकीतून जरांगेंची माघार…लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवार देण्याची मागणी केली जात होती. यासाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत आपण उमेदवारी देणार नसून, निवडणूक लढवण्यासाठी कोणताही उमेदवार जाहीर करणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.