तेलाचे गोडाऊन फोडणाऱ्या दोघांना आळेफाटा पोलीसांनी केले जेरबंद; २ लाख रूपयांच्या तेल डब्यांची केली होती चोरी
1 min read
आळेफाटा दि.२:- तेलाचे गोडाऊन फोडणाऱ्या दोन चोरटयांस आळेफाटा पोलीसांनी जेरबंद केले आहे.या बाबत आळेफाटा पोलीस स्टेशनकडुन मिळालेल्या माहितीनुसार दि.४ सप्टेंबर २३ रोजी आळेफाटा येथील विठ्ठल रामचंद्र बेल्हेकर यांचे वडगाव आनंद (ता.जुन्नर) या गावात ज्ञानेश्वर निमाजी भुजबळ याच्या गाळयात तेलाचे गोडाऊचे अज्ञात चोरटयानी लाकडी दरवाजा तोडून. खिडकीचे ग्रिल उचकटून त्यावाटे गोडाऊनमध्ये प्रवेश कटारून २ लाख १७ हजार ७६६ किमतीचे तेलाचे डबे, तेलाचे पाकीटे, बॉक्स चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेता आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिश होडगर यांनी पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व स्टाफची पथके बनवून त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सुचना केल्या होत्या.
त्या अनुषंगाने पोलीस पथक हे गुन्हयाचा तपास करीत असताना पोलीस पथकाला गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की १) अशुतोष सुरेश बेल्हेकर रा बेल्हेकरपट, पो. काळवाडी ता. जुन्नर जि.पुणे व २) अशोक रामकृष्ण काचळे रा. काचळेमळा, भटकळवाडी पो पिंपळवंडी ता.जुन्नर जि.पुणे) यांनी लोकल मार्केटमध्ये तेलाचे डब्बे व पुड्यांची विक्री केली आहे.
अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याचा शोध घेवून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले त्यांनतर त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंघाने चौकशी केली असता, त्यांनी गुन्हयाची कबुली दिली की, आम्ही याअगोदर मार्केटींगचे काम करीत असल्याने आम्ही गोडाऊन मधून रात्रीचे वेळी तेलाचे डब्बे चोरून आमचे ओळखीच्या असलेल्या लोकांना विक्री केली आहे.
असे सांगितले त्यांना गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून त्यांनी गुन्हयात वापरलेल्या मोटार सायकली तसेच तेलाचे डबे व पुड्यांची विक्री करून असलेले पैसे असा एकुण १,९०,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख ,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. बी. होडगर यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, सहा. फौजदार चंद्रा डुंबरे, पो. हवा. विनोद गायकवाड, पो.ना पंकज पारखे, पो.ना शिंगाडे, पो.कॉ. अमित माळुंजे, पो.कॉ नविन अरगडे, पो.कॉ. हनुमंत ढोबळे यांनी केली आहे.