बेल्हे येथे गोमांस पकडले; बेल्ह्यातील दोघांवर गुन्हा दाखल
1 min read
बेल्हे दि. २७:- बेल्हे (ता. जुन्नर) येथील मंगळवार दि.२७ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आळेफाटा पोलिसांनी ६० किलो वजनाचे गोमांस तुकडे एका पिकप गाडीतून हस्तगत केले असून दोघांना विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये एकूण १ लाख ७३ हजार रुपयांचा मुददेमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बेल्हे येथील बेल्हे-जेजुरी हायवेरोडचे लगत लाल मस्जिदीचे पाठीमागील बाजुस झाडा-झुडपामध्ये एक पिकअप गाडी कमांक एम.एच.१४ डी. एम.६४३७ ही उभी असलेली दिसली
पिकप मध्ये गोमंसाचे तुकडे असल्याची खबर मिळाली त्यानुसार आळेफाटा पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणे केले असता पिकप मधील सुमारे ६० किलो वजनाचे रुपये १८ हजार रुपये किमतीचे मांसाचे तुकडे तसेच पिकप १ लाख ५० हजार रुपयाची
(एम एच 14 डीएम 64 37) असा एकूण १ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुबेर शब्बीर बेपारी (वय २४) व प्रशांत मारूती नायकोडी (वय २४) दोघे (रा. बेल्हे ता. जुन्नर जि. पुणे) यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची फिर्याद आळेफाटा पोलिस स्थानकाचे पोलिस कॉन्स्टेबल सचिन राहणे यांनी दिली आहे.