पिंपळवंडीत व बेल्ह्यात चोरी करणाऱ्या आरोपींना नाशिकमधून घेतले ताब्यात; ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
1 min read
आळेफाटा दि.२:- ५० हुन अधिक गुन्हे दाखल असलेला, वयोवृध्द लोकांना शोधून ओळख असल्याचे भासवून दिवसा चोरी करणारा सराईत गुन्हेगारास आळेफाटा पोलीसांनी केली अटक.याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन कडुन मिळालेल्या माहितीनुसार पिंपळवंडी गावातील बाम्हणेमळा या ठिकाणी रहात असलेले ओंकार भास्कर बाम्हणे यांचे आजोबा घरी असताना. एक अज्ञात इसम घरी येवून तुमच्या मुलाची व माझी ओळख आहे असे सांगून संधीचा फायदा घेवून घरात घुसून घरातील सोन्याचे दागिने चोरून नेलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच बेल्हे या ठिकाणी शिंदे मळ्यातील निलेश शिंदे यांच्या घरी अशाच प्रकारे घटना घडली होती.
सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेता आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिश होडगर यांनी या साठी विशेष पथके बनवुन त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सुचना केल्या होत्या त्यानुसार सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान पोलीस पथकाने सी.सी.टी व्ही फुटेज तसेच आरोपीची गुन्हा करण्याची पध्दत याचा बारकाईने अभ्यास करून.
अशाप्रकारचे गुन्हे करणारे आरोपी यांची माहिती गोळा करून नमुद गुन्हयातील साक्षीदार यांनी आरोपीचे सांगितलेल्या वर्णनानुसार सदरचा गुन्हा हा आरोपी संदिप साहेबराव रायते रा. खडकमाळवाडी ता. निफाड जि.नाशिक याने केल्याची खात्री झाल्याने तात्काळ पोलीस पथक हे नाशिकला रवाना होवून अत्यंत शिताफीने नमुद आरोपीस ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषधाने चौकशी केली असता.
त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास गुन्हयाचे तपासकामी अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवून नमुद आरोपीकडून त्याने गुन्हयात वापरलेली मोटार सायकलसह चोरीस गेलेला दोन गुन्हयातील सोन्याचे दागिने असा एकुण ३,४५,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या आरोपींवर ५० हुन अधिक गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी हि पुणे ग्रामीण चे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीष बी. होडगर यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, सहा. फौजदार चंद्रा डुंबरे, सहा. फौजदार सतीष टाव्हरे, पो.हवा. विनोद गायकवाड, पो.ना पंकज पारखे, पो.कॉ. अमित मालुंजे, पो.कॉ नविन अरगडे, पो.कॉ. हनुमंत ढोबळे यांनी केली आहे.