ठाकरे गटाची १६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
1 min readमुंबई दि.२७:- ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये १६ उमेदवारांची नावे आहेत. शिर्डीतून भाऊसाहेब वाघचाैरे यांना संधी देण्यात आली आहे. उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या १६ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे.या यादीनुसार भाऊसाहेब वाघचौरे (शिर्डी), नरेंद्र खेडेकर (बुलढाणा), संजय देशमुख (यवतमाळ-वाशिम), संजोग वाघेरे-पाटील (मावळ), चंद्रहार पाटील (सांगली), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), चंद्रकांत खैरे (संभाजीनगर), ओमराजे निंबाळकर (धाराशिव). राजाभाऊ वाजे (नाशिक), अनंत गीते (रायगड), विनायक राऊत ( सिंधुदुर्ग-रत्नागिरी). राजन विचारे (ठाणे), संजय दिना पाटील (मुंबई-ईशान्य), अरविंद सावंत (मुंबई-दक्षिण), अमोल कीर्तीकर (मुंबई वायव्य), संजय जाधव (परभणी) ही १६ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे.