आढळराव पाटलांची पक्ष प्रवेशाची तारीख ठरली

1 min read

मुंबई दि.२३:- आज झालेल्या बैठकीत मागील काही दिवसापासून सुरु असणारा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेवर आता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय.

त्यामुळे महायुतीने याठिकाणी उमेदवार आयात केल्याचे दिसून येतंय. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा मुहूर्त ठरलाय.

होळीनंतर येत्या 26 मार्च रोजी शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीकाँग्रेस (अजित पवार) गटामध्ये मध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आढळराव पाटील हेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील हे आता नक्की झालंय. एकनाथ शिंदेंनी जुलै 2022 मध्ये बंड केल्यावर आढळराव पाटील त्यांच्यासोबत गेले होते.

आजही त्यांचे शिंदेंशी कुठलेही मतभेद नाहीत. पण महायुतीच्या वाटाघाटीत शिरूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेली, उमेदवारी मात्र आढळरावांना देण्याचं ठरलं. म्हणून मग एकनाथ शिंदेंनी एकाप्रकारे आपला उमेदवार निर्यात करण्याचं ठरवलं, आणि त्यामुळे आढळराव अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

पक्षप्रवेशाविषयी बोलताना.”माझा पक्ष प्रवेश माझ्या मतदारसंघात 26 मार्चला होणार आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर मी निवडणुकीला उभा राहणार असन ही जागा नक्कीच जिंकणार असा विश्वास आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे