आढळराव पाटलांचा अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत होणार राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश

1 min read

मुंबई दि.२३:- शिंदे गटाचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचा आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील हाती घड्याळ बांधणार आहे.

तसेच हा प्रवेश आजच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर लोकसभा लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच आता शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अजित पवारांनी मुंबईत बैठक बोलवली असून त्यावेळी आढळाराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला शिरूर लोकसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार उपस्थित राहणार आहेत. आज सकाळी 10 वाजता मुंबईत देवगिरी बंगल्यावर बैठक होणार आहे.

दरम्यान, शिरुर लोकसभेची जागा महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे. तर शिंदे गटात असलेले शिवाजी आढळराव पाटील या जागेवरुन लढण्यास इच्छुक असल्याने ते पक्षप्रवेश करत अमोल कोल्हे यांच्याविरोधात मैदानात उतरणार आहेत.

मूळचे पुणे जिल्ह्यातील आंबेगावचे असलेले शिवाजी आढळराव पाटील हे भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आहेत. 2004, 2009 आणि 2014 साली त्यांनी शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवत मोठा विजय मिळवला होता.

मात्र 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला होता. 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. आता पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे