शेतकऱ्याच्या मुलीचे स्वप्न पूर्ण; वनरक्षक पदी निवड
1 min read
आळेफाटा दि.२०:- पिंगळे मळा येथील शेतक-याच्या मुलीने तीन हजार तीनशे मुलींमधुन प्रथम क्रमांक घेऊन वनरक्षक पदी निवड झाली आहे.
आळे (ता.जुन्नर) येथील तानाजी दशरथ पिंगळे यांची परिस्थितीने अतिशय गरीब असलेल्या शेतकऱ्याच्या नेहा पिंगळे या मुलीची ठाणे जिल्ह्यात वनरक्षक पदी निवड झाल्याने तिने तिच्या आई वडिलांचे स्वप्न पुर्ण केले आहे.
तानाजी पिंगळे हे आपली घरची असलेली थोडीफार शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना त्यांचे स्वप्न होते की आपल्या मुलीने चांगल्या पदावर जाऊन काम करावे अशी इच्छा होती व आज त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता.
पहिल्यापासूनच शालेय जीवनातून अभ्यासाची गोडी असताना मनात जिद्द होती की आपण काहीतरी करू शकतो यासाठी त्यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक जिल्हा परीषद प्राथमिक शाळा शिंदे बाम्हणे मळा व ज्ञानमंदिर हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज गावातच झाले.
हे प्रशिक्षण घेत विविध परीक्षांचा अभ्यास पूर्ण करत वन खात्यामध्ये प्रथम दलामध्ये भरती होऊन एक आदर्श समाजापुढे दाखवून दिला आहे. तिला यासाठी वडील तानाजी चुलते रविंद्र व नितीन यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करत आई-वडिलांच्या अथक परिश्रम व कष्टाला सार्थ अभिमान वाटावा हे यश मिळवले आहे.
तसेच जुन्नर तालुक्यातील सर्व परिसरातून तसेच आळे येथील ग्रामस्थांकडून तसेच विविध माध्यमातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
“आपल्या मुलीने चांगल्या शासकीय पदावर काम करून समाज सेवेची काम करावे ही माझ्या आई वडिलांची इच्छा होती. आमची घरची परिस्थिती अतिशय गरीब असुन सुध्दा काबाडकष्ट करुन शिकवले.तसेच मला जिद्द ठेवल्याने आज माझे स्वप्न पुर्ण झाले आहे.”
नेहा पिंगळे