धरणांतील पाणीसाठा कमी; माणिकडोह १५ तर चिल्हेवाडी २४ टक्के
1 min read
जुन्नर दि.२१:- जुन्नर तालुक्याला दुष्काळाच्या झळा बसायला लागल्या असून धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे पाणी नियोजन करणे महत्त्वाचे ठरत आहे. यावर्षी पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे लवकरच पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्याचा परिणाम म्हणजे धरण पूर्ण क्षमतेने भरली नव्हती. सद्या धरणातील पाणीसाठाची टक्केवारी कमी झाली आहे. गुरुवार दि.२१ रोजी माणिकडोह १५.६५ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून येडगाव ५३.७५ टक्के, वडज ३७.६५, पिंपळगाव जोगे ३३.८७, डिंभे ४४.३५, विसापूर २७.३८, चिल्हेवाडी २४.६२, घोड ३२.६८ इतका पाणीसाठा सध्या शिल्लक आहे.
भविष्यात पाण्याचे नियोजन होणे महत्त्वाचे असून अन्यथा तीव्र पाणीटंचाईला चा सामना नागरिकांना व शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. पाण्याचे योग्य नियोजन होणं अपेक्षित आहे अन्यथा शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल असे चित्र सद्या तरी दिसत आहे.