आरोग्य वार्ता ! मखाणे खाल्ल्यास रोग राहतील लांब; आरोग्यासाठी फायदेशीर मखाणे

1 min read

पुणे दि.२०:- मखाने खाण्याचे मानवी शरीराला फायद्याचे आहे. या मुळे शरीरातील विविध आजार बरे होतात किंबहुना लांब राहतात. त्यात महत्वाचा म्हणजे मधुमेहसारखा आजार नाहीसा होतो. हृदयासाठी फायदेशीर :- मखाण्याचा प्रभाव फक्त मधुमेहाच्या रुग्णांसाठीच फायदेशीर आहे असे नव्हे तर हृदयविकाराच्या गंभीर आजारांमध्येही फायदेशीर आहे. त्याचे नियमित सेवन केल्याने हृदय निरोगी राहते आणि पचन तंत्र सुरळीत होते.• ताण कमी करण्यासाठी लाभकारी :- ज्यांना तणाव होऊन अनिद्रेचा त्रास उद्भवतो, त्यांच्यासाठी मखाण्याचे सेवन करणे लाभकारी असते. याला दररोज झोपण्याआधी दुधाबरोबर घ्यावे, त्यामुळे अनिद्रा त्रास कमी होतो.• सांधेदुखीपासून आराम :- मखाण्यात कॅल्शियम भरपूर असते. याच्या नियमित सेवनाने सांधेदुखी, संधिवातसारखे आजार झालेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.• पचन सुधारते : मखाण्यात अँटी ऑक्सिडेन्ट भरपूर प्रमाणात असतात; ज्याला सर्व वयोगटातील लोक सहज पचवू शकतात. याशिवाय यात एस्ट्रोजनचे गुणधर्म देखील असतात. अतिसारसारख्या त्रासापासून मुक्त होऊन भूक वाढवण्यास सहाय्यक आहेत.• मूत्रपिंड बळकट करणे : मखाण्याच्या फुलात गोडपणा कमी असल्याने प्लीहा निर्विष (डिटॉक्सिफाइड) करण्याचे कार्य करते. मूत्रपिंड बळकट करण्यासाठी आणि रक्तशुद्धी करण्यासाठी याचे नियमित सेवन करावे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे