उन्हाळ्यात उसाचा रस पिताय? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

1 min read

पुणे दि.३१:- उन्हाळा सुरू झाला असल्याकारणाने रस्त्यावर अनेक ठिकाणी ऊसाचा रस दिसतो. तहान शमविण्यासाठी तसेच आपल्या आरोग्यासाठी ऊसाचा रस हेल्दी आहे.उसाचा रस पिण्याचे खालील फायदे आहेत.हायड्रेशन : उसाचा ताजा आणि थंडगार रस शरीरातील पाण्याची कमतरता दूर करतो आणि शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतो.पचनशक्ती : उसामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात; जे पचनाशी संबंधित समस्या दूर करतात.ऊर्जा वाढवते :उसामध्ये असलेली नैसर्गिक साखर दिवसभर ऊर्जा टिकविण्यास मदत करते.*इलेक्ट्रोलाइट संतुलन:* उसामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे असतात; ज्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यास मदत होते.*अँटिऑक्सिडंट्स :* उसामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात, जी शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात.शक्यतो उसाचा रस पिताना त्यात बर्फ टाकण्याचा आग्रह करू नये. बर्फ हा दूषित पाण्यापासून तयार केलेला असू शकतो. त्यामुळे आरोग्य बिघडू शकते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे