महिला दिनानिमित्त माफक दरात सिझर व ऑपरेशन च्या नोंदणीची मुदत वाढली; महेश मेमोरियल हॉस्पिटलची माहिती

1 min read

आळेफाटा दि.१०:- जागतिक महिला दिनानिमित्त आळेफाटा (ता. जुन्नर) येथील महेश मेमोरियल हॉस्पिटल यांनी सिझर २२५०० तर गर्भाशय पिशवी काढणे २५ ते २६ हजार रुपयांत करण्याचे ठरवले असून यासाठी नाव नोंदणीची मुदत वाढवण्यात आली असून आता १५ मार्च पर्यंत नाव नोंदणी करण्यात येणार आहे.

या वेळी बोलताना डॉ. मनिषा व डॉ. संजय गाडेकर यांनी सांगितले की, आम्ही गेली १० वर्षे आळेफाटा या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करत आहोत. आम्ही नेहमीच सर्वसामान्यांसाठी आर्थिक परिस्थितीने कमकुवत असलेल्यांसाठी वाजवी दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिलेली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून “८ मार्च” जागतिक महिला दिनाचे निमित्त साधून आपल्या माता-भगिनींसाठी एक योजना राबवत आली होती. यामध्ये दि. ०२/०३/२०२४ ते ०८/०३/२०२४ या कालावधीमध्ये नोंदणी करण्याची मुदत देण्यात आली होती.

ही मुदत वाढून देण्याची मागणी काही नागरिकांनी केली होती त्यानुसार ही मुदत १५ मार्च पर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्या स्त्रिया त्यांची नोंदणी करतील त्यांचं सिझर हे फक्त २२५००/- रूपया मध्ये औषधासहित करण्यात येईल.

तसेच २५ ते २६ हजार रू. मध्ये गर्भाशय काढण्याचे ऑपरेशन औषधा सहित करण्यात येईल. फक्त त्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. फक्त या मध्ये त्या स्त्री ला डायबेटीस, ब्लड प्रेशर, फिट यासारखे आजार नसावेत व रक्त (हिमोग्लोबिन) कमी नसावे. तसेच इतर ऑपरेशनमध्ये सुद्धा सहकार्य करण्यात येईल. उदा., छातीच्या गाठी, हर्निया, अपेंडीक्स इ.

आम्ही सर्वांना आश्वासन देतो की यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड (No Compromise) केली जाणार नाही. म्हणजे ऑपरेशन करताना वापरण्यात येणारी इंजेक्शन आणि टाके घालण्यासाठी वापरण्यात येणारे धागे अगदी चांगल्या दर्जाचे (Standard & Good Quality) चे वापरले जातील. त्यात कोणतीही शंका नसावी.

त्यामुळे कुणाच्याही दुष्प्रचाराला बळी पडू नका. शेवटी बील तुम्हालाच द्यायचं आहे. बाकीचे लोक तुम्हाला फक्त फुकटचा सल्ला देतील पण एक रूपयाची मदत सुद्धा कोणीही करणार नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे