आळेफाटा येथील श्री हॉस्पिटल मध्ये रोटरी डायलेसिस सेंटर सुरू
1 min read
आळेफाटा दि.४:- रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल, सिद्धकला हॉस्पिटल पेन व श्री हॉस्पिटल आळेफाटा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री हॉस्पिटल आळेफाटा येथे रोटरी डायलेसीस सेंटर चा भव्य उद्घाटन समारंभ आणि हृदयरोग व मूत्ररोग शिबिराचे आयोजन रविवार दि. 3 मार्च रोजी संपन्न झाला.
यावेळी सिद्धकला हॉस्पिटल पेनच्या डॉ सोनाली वानगे मॅडम, रोटरी क्लब पुणे डाऊन टाऊन च्या झोनल प्रमुख पल्लवी साबळे, रोटरी क्लब पेनच्या नेक्स्ट प्रेसिडेंट नेवाळे मॅडम,तसेच रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल चे अध्यक्ष विजयकुमार आहेर, उपाध्यक्ष संभाजी हाडवळे सर, सचिव पराग गांधी, संस्थापक महावीर पोखरणा,
माजी अध्यक्ष आणि प्रोजेक्ट इन्चार्ज ज्ञानेश जाधव, हेमंत वाव्हळ, राजेंद्र भळगट, अक्षय शिंदे, विजय कणसे, ऍड संजय टेंभे, रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल चे सर्व सदस्य, जुन्नर तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ मनोज काचळे, उपाध्यक्ष डॉ शिवाजी सोनवणे,कोषाध्यक्ष डॉ वाणी, सेक्रेटरी डॉ संतोष ढवळे, डॉ शेख, डॉ पावडे, आणि
आळेफाटा येथील सर्व प्रथित यश डॉक्टर्स श्री हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. सचिन शिंदे, डॉ. मनीषा शिंदे हे यावेळी उपस्थित होते. ग्रामीण भागातील गरजूंना डायलिसिस सेंटर साठी पुणे किंवा अहमदनगर या ठिकाणी जावे लागत होते, परंतु आपल्या जवळ आळेफाटा या ठिकाणी अशा प्रकारची सुविधा उपलब्ध नव्हती ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
सर्व गरजू व्यक्तींनी या सेवेचा लाभ घ्यावा असे डॉ सोनाली वानगे यांनी आपल्या मनोगत जाहीर केले. ग्रामीण भागात शहरी भागासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रोटरी नेहमीच पुढाकार घेत असते अशा प्रकारे पल्लवी साबळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
यावेळी डॉ मनोज काचळे, महावीर पोखरणा, सोनाली वांगी, पल्लवी साबळे, विजयकुमार आहेर यांनी आपली मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री हॉस्पिटलचे डॉ. सचिन शिंदे यांनी केले आभार डॉ.मनीषा शिंदे यांनी मानले.