शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
1 min read
ओतूर दि.२९:- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग डुंबरवाडी ओतूर (ता.जुन्नर) येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे उत्कृष्ट व्याख्याते आकाश पाटील तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ओतूर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक लहु थाटे. श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे मानद सचिव वैभव तांबे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका आणि श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त नीलम तांबे , कृषी बाजार समिती जुन्नर संचालिका प्रियंका शेळके, माजी सैनिक विलासजी जाधव, माजी सैनिक गोपीनाथ घुले आणि त्यांच्या समवेत आलेले सर्व त्यांचे माजी सैनिक सहकारी.
खामुंडी गावचे सरपंच वनराज शिंगोटे, उदापूरचे तंटामुक्ती अध्यक्ष राज शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी यु खरात, सर्व विभागप्रमुख, स्नेहसंमेलनाचे समन्वयक प्राध्यापक सिद्धार्थ पानसरे, कार्यालय अधिक्षक विशाल बेनके,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयाने गेली चार दिवसापासून अनेक उपक्रम घेतले त्यामध्ये हॉलीबॉल, क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस, रांगोळी, साडी डे, बॉलिवूड डे, नृत्यकला नाटक अशा अनेक प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपले कौशल्य दाखवले त्यातून विशेष कौशल्य आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी यु खरात यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या यशस्वी कामगिरीचा तसेच शिक्षकांचे शोध निबंध महाविद्यालयाच्या माहितीचा अहवाल वाचून दाखविला.कार्यक्रमाप्रसंगी व्याख्याते आकाश पाटील यांनी आयुष्य जगत असताना अनेक अडचणी येत असतात परंतु त्या अडचणींना सामोरे जाऊन यशस्वी कसे बनता येईल.
तसेच भारतीय शिक्षण व्यवस्था ही स्वयंपूर्ण नाही तर ती युरोप जपान या देशांसारखी कशी मानवकेंद्रित हवी हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. शिक्षण क्षेत्रात परिवर्तन हवे तसेच शिक्षणाच्या पलीकडे अनेक शाखा असुन त्याचा आपण अभ्यास करावयास हवा. सर्वात महत्त्वाचा आपला आत्मविश्वास अतिशय महत्त्वाचा आहे हे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे उदाहरण देऊन स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे प्रेम कसे करावे या संदर्भात कुसुमाग्रज , बाबा आमटे, गोरा कुंभार, यांचे दाखले देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आई-वडील आपले आदर्श असायला हवे त्यांची स्वप्न ही आपली स्वप्ने आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरणे ही आपली जबाबदारी आहे असे प्रतिपादन पाटील यांनी केले. तसेच अनेक इतिहासातील दाखले देत वचनपूर्ती कशी करावी हे सांगितले जो माणूस आयुष्यात चुका मान्य करतो तो जीवनात यशस्वी होतो.
असे सांगून माणसाने नेहमी नम्र राहावे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना लहू थाटेसाहेब यांनी आपल्या जीवनामध्ये एक तरी छंद जोपासायला पाहिजे. कलेवर प्रेम केले पाहिजे कलेशी मैत्री करा हे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. माझी सैनिक विलासजी जाधव यांनी आपल्या देशाची संरक्षण व्यवस्था आपले सैनिक संरक्षण करताना किती हाल अपेष्टा सहन करतात याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.
तसेच माजी सैनिक गोपीनाथ घुले यांनी तुमचा अभ्यास किंवा तुम्ही करत असलेले कोणतेही काम चांगल्या पद्धतीने करा. प्रथमता भारत देशाप्रती राष्ट्रभक्ती महत्त्वाची आहे. सैनिकांचे मन व त्यांचे काम कसे असते सैनिक आपले पूर्ण आयुष्य हे देशासाठी समर्पित करतो हे अनेक काव्यपंक्तीने विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. प्रियंका शेळके यांनी ग्रामीण भागातील कॉलेज असूनही पेटंट मिळवणे हे महत्त्वाचे आहे.
तसेच इंग्रजीवर आपले प्रभुत्व पाहिजे आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणचे काम व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने केले पाहिजे हे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ पूजा घोलप यांनी केले आणि प्राध्यापक नीता बाणखेले यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.