बेल्हे शाळेत ७५ असाक्षर व्यक्तींसाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणीचे आयोजन
1 min read
बेल्हे दि.१८:- जिल्हा परिषद शाळा बेल्हे नं-1 शाळेत नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी चे आयोजन करण्यात आले. यामध्ये शाळा परिसरातील 7 असाक्षर व्यक्तींनी सहभाग घेत चाचणी सोडवली.
हरिदास घोडे यांनी केंद्रसंचालक म्हणून काम पाहिले याप्रसंगी केंद्रप्रमुख सोपान बेलकर यांनी केंद्रास भेट दिली. अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका मिरा बेलकर यांनी दिली.
नवभारत साक्षरता अभियान हे 35 वर्षावरील निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी राबविण्यात येत असून उल्हास ऍप च्या माध्यमातून या असाक्षर व्यक्तीची नोंदणी करून त्यांना शिकवण्यासाठी त्याच्या कुटुंबातील सुशिक्षित व्यक्तीची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
गावठाण व संपूर्ण बेल्हे परिसर यामध्ये एकूण 75 असाक्षर व्यक्ती असून त्यांच्यासाठी हे अभियान सूरु आहे. शाळेतील उप शिक्षिका कविता सहाने, सुवर्णा गाढवे, प्रविणा नाईकवाडी, योगिता जाधव, सुषमा गाडेकर, अंजना चौरे, संतोष डुकरे यांनी परीक्षेचे नियोजन केले.
शिक्षण विस्तार अधिकारी अधिकारी विष्णू धोंडगे व गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे यांचे यासाठी मार्गदर्शन लाभले.