‘उमंग प्रश्नमंजुषा’ कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा पाभे विध्यार्थी गटाचा दणदणीत विजय
1 min read
खेड दि.१७:- शिक्षणा फौंडेशन मार्फत टोकावडे आश्रमशाळा येथे “उमंग प्रश्नमंजुषा” घेण्यात आली. यामध्ये खेड तालुक्यातील टोकावडे, मोरोशी, कोहिंडे केंद्रातील शाळा सहभागी झाल्या.जि. प. शाळा पाभे येथील विध्यार्थी गटाने स्पर्धेत दणदणीत विजय मिळवला आणि तालुकास्तरीय स्पर्धासाठी पात्र ठरली.बाकी शाळेतील 7 वी पर्यंत चे विध्यार्थी असताना पाभे शाळेने 4 चे विध्यार्थी असून शाळेने 70 गुणांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. सहभागी विध्यार्थी 1) सार्थक कोकाटे, 2) आदिती मराडे, 3) वैष्णवी गुरव, 4) आराध्या कोकाटे या वेळी गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले,बीटाचे विस्तार अधिकारी जीवन कोकणे, केंद्रप्रमुख भरत लोखंडे यांनी विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक व शाळेचे खूप अभिनंदन केले.