समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे शासकीय आरेखन परीक्षेत यश
1 min readबेल्हे दि.१७:- महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात राज्य रेखा कला २०२४ या परीक्षेमध्ये समर्थ गुरुकुल बेल्हे येथील २५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.वैष्णवी बोरचटे, विघ्नेश गावडे,श्रेयस म्हस्के,उत्कर्ष बेलकर,सत्यम गफले, चैत्राली गाजरे,श्रेया गोफणे,दिशीता रावत,श्रावणी गुंजाळ समृद्धी शेळके,सार्थक शेळके,श्रावणी चौधरी, संस्कार देशमाने हे विद्यार्थी एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत तर काव्या गुंजाळ,प्रणव कडूसकर.कीथे श्री वैष्णव कार्तिके,सार्थक गलांडे,श्रेयश डोंगरे, तनिष्का खुटाळ,सरी आहेर,ज्ञानेश्वरी साळुंके,संस्कार भांबेरे,सृष्टी औटी,भक्ती जाधव,सोहम शिरोळे हे विद्यार्थी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी बसले होते.नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये गुरुकुलचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.सात विद्यार्थी ब श्रेणी मध्ये व १८ विद्यार्थी क श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्याची माहिती समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे व क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी दिली.या विद्यार्थ्यांना कला शिक्षिका दीप्ती चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके.विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,सारिका शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर व सर्व विभागाचे प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.