ओलंपियाड परीक्षेत विद्यानिकेतनच्या १०१ विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक
1 min read
साकोरी दि.१५:- सिल्वर झोन फाउंडेशन, न्यू दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ओलंपियाड परीक्षेत विद्यानिकेतन इंटरनॅशनल ॲकॅडमी, साकोरी (ता.जुन्नर) च्या पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण १२८ विद्यार्थी बसले होते त्यातील १०१ विद्यार्थ्यांनी सुवर्ण, १८ विद्यार्थ्यांनी रौप्य तर ५ विद्यार्थ्यांनी कास्य पदक प्राप्त केले आहे. २३ डिसेंबर २०२३ रोजी या परीक्षा विद्यालयातच संपन्न झाल्या होत्या. विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करून त्यांचा जास्तीत जास्त सराव घेणाऱ्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांचा देखील सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग साळवे, पूर्व प्राथमिक विभागाच्या प्राचार्या रूपाली पवार-भालेराव, विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी चे प्राचार्य अमोल जाधव, पी एम हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज च्या प्राचार्या सुनीता शेगर यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार व कौतुक केले.