अलाईव्ह संस्थेच्या ‘चला चिऊ वाचवू’ अभियानात ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुलचा द्वितीय क्रमांक
1 min read
शिरूर दि.२०:- जागतिक चिमणी दिनानिमित्त २० मार्च रोजी पुणे येथील अलाईव्ह संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या चला चिऊ वाचवू अभियानांतर्गत जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुल शिरूर ची विद्यार्थिनी तनिष्का जासूद हीचा द्वितीय क्रमांक आला.
प्राचार्या रुपाली जाधव, प्राचार्य गौरव खुटाळ, समन्वयक शोभा अनाप व सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी तनिष्काच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.
गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. राजेराम घावटे, सचिव सविता घावटे, संचालक दीपक घावटे, संचालिका अमृतेश्वरी घावटे, संचालक शिंदे सर,
सीईओ डॉ. नितीन घावटे, सेमी विभाग प्राचार्य संतोष येवले, सेमी प्राथमिक विभाग प्राचार्या सुनंदा लंघे, विभाग प्रमुख जयश्री खणसे यांनी तनिष्काचे हार्दिक अभिनंदन केले.