…..अन्यथा मराठा समाजाचा जुन्नर तहसीलदार कचेरीवर मोर्चा
1 min read
जुन्नर दि.१४:- जुन्नर तालुका मराठा समाज समन्वयक माऊली खंडागळे, प्रमोद खांडगे पुणे जिल्हा समन्वय अनिल गावडे योगेश तोडकर सचिन थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी जयेश खांडगे प्रवीण डोंगरे साईनाथ ढमढेरे राजेंद्र ढोमसे सुशांत दिवटे अनिल देशपांडे उपस्थित होते. यावेळी पुढील मागण्या करण्यात आल्या. सकल मराठा समाज जुन्नर तालुका यांच्याकडून जुन्नर तहसील कार्यालयातील कुणबी नोंदी आढळलेल्या कागदपत्रांची मोडी मराठी लिपीचे भाषांतर करण्यासाठी शासनाने मोडी लिपी वाचकांना अधिकृत मानधन द्यावे व ते प्रसिद्ध माध्यमांमध्ये प्रसिद्ध करावे जेणेकरून सर्वसामान्य मराठा नागरिकांचे फसवणूक होणार नाही.
सर्वसामान्य मराठा नागरिकांमध्ये याबाबत शंका असल्यानेआर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. तसा पत्र व्यवहार या अगोदर दिनांक १९/१२/२०२३ रोजी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केलेला आहे. परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे मराठा समाजाची पिळवणूक होताना दिसत आहे.
तहसीलदार ऑफिसने अधिकृत काढल्याप्रमाणे तसे पत्र मराठा समाजाला दिलेले आहे मोडीवाचकांचे मानधन शासनामार्फत देण्यात यावे व मराठा समाजाची पिळवणूक थांबवावी रूपांतर करण्यासाठी तहसीलदार ऑफिसमध्ये बैठक व्यवस्था करावी.याची अधिकृत घोषणा करावी अन्यथा मंगळवार दिनांक १९/०३/२०२४ रोजी तहसीलदार कचेरीवर सकल मराठा समाज जुन्नर तालुका यांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल.
असा इशारा तहसीलदार सबनीस यांना दिल्यानंतर त्यांनी मराठा समाजाचे प्रतिनिधी यांना समाजाच्या मागण्यांचा तात्काळ विचार करू १९/०३/२०२४ च्या आधी पूर्ण करू असा आश्वासन दिले आहे. अशी माहिती मराठा समाजाचे जुन्नर तालुका समन्वय प्रमोद खांडगे पाटील यांनी दिली.